यावल येथे ना. जावळे यांच्याहस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसास धनादेश

na. javale

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात आज दि. 11 सप्टेंबर रोजी सात लाभार्थी महिलांना आणि आत्महत्या केलेल्या दोन शेतकरी कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत 1 लाख 40 हजार रुपयांच्या धनादेश ना. हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील चोपडा मतदार संघातील पथराळे येथील लताबाई धिवर, साकळी येथील मुमताज तडवी, मनवेल येथील सुनिता अडकमोल आणि रावेर मतदार संघातील फैजपुर येथील निर्मला कापले, अद्रावल येथील नंदा चौधरी, पाडळसे येथील मनिषा कचरे या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचा कमाविता कुटुंब प्रमुखाच्या निधनानंतर शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या वारसाला प्रत्येकी 20 हजार रूपयांचे धनादेश असे एकुण 1 लाख 40 हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले आहेत. तर तालुक्यातील टाकरखेडा येथील राजेंद्र सोनवणे आणि मनवेल येथील सुरेश पाटील या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास प्रत्येकी 1 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आला आहे. याप्रसंगी नायब तहसीलदार आर.के.पवार, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष विलास चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, भाजपाचे सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत यांच्यासह आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

Protected Content