आयएनएस विक्रमादित्यवर पहिल्यांदाच उतरले नौदल ‘तेजस’

Naval Tejas

मुंबई प्रतिनिधी । देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच नेव्हल लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस आज विमानवाहक युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर उतरण्यात यशस्वी झाले आहे.

समुद्र आधारित परीक्षण केंद्रावर व्यापक परीक्षण पूर्ण केल्यानंतर डीआरडीओ, एडीएद्वारे विकसीत एलसीए नेव्हीनं आयएनएस विक्रमादित्यवर शनिवारी सकाळी १०.०२ वाजता यशस्वी लँडिंग केले आहे. कमोडोर जयदीप मावळकर यांनी हे लँडिंग यशस्वी केले आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) द्वारे विकसित करण्यात आलेले लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट ‘अरेस्टर वायर’च्या मदतीनं आयएनएस विक्रमादित्यवर उतरले. एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी नौसेनेसोबत मिळून लढाऊ एअरक्राफ्ट विकसीत करत आहे. पण आता भर समुद्रात विमानवाहू नौकेच्या धावपट्टीवर विमानाने ही यशस्वी कामगिरी केली. आयएनएस विक्रमादित्य ही मुंबईतील पश्चिम कमांड मुख्यालयाचा एक भाग असून मुंबई अंतर्गत अरबी समुद्रात ही चाचणी झाली.

 

Protected Content