‘महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी’ असे चालणार नाही : उध्दव ठाकरे

रत्नागिरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बारसू रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांची आज उध्दव ठाकरे यांनी  भेट घेऊन घणाघाती टिका केली.

 

माजी मुख्यंमत्री उध्दव ठाकरे हे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. आज सकाळी त्यांनी बारसू रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांशी संवाद साधतांना केंद्र व राज्यातील विरोधकांवर कडाडून टिका केली. याप्रसंगी सोलगावातील आंदोलकांनी बोलतांना त्यांनी चांगले प्रकल्प गुजरातला पळवून नेत असून राखरांगोळी करणारे प्रोजेक्ट आमच्या माथी मारत आहेत. गुजरातला रांगोळी आणि आम्हाला राख असे चालणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला.

 

दरम्यान, याप्रसंगी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देशभरात गद्दार अशी ओळख झाली असल्याची टिका देखील केली. त्यांना तीन जिल्ह्यात देखील कुणी ओळखत नसल्याचा टोला देखील ठाकरे यांनी मारला. रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा डाव आखल्या जात आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीचं समर्थन करुन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांनी दिले आहे. मी मन की बात करायला आलो नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content