पुरनाड येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश 


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड (ठेलारी वस्ती) येथे आज झालेल्या भव्य कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करून पक्षाच्या ताकदीत मोठी भर घातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनसंपर्कप्रधान कार्यपद्धतीवर आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन या ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

या प्रवेश सोहळ्यावेळी मिठाराम मिठू ठेलारी, रघुनाथ दगडू ठेलारी, सिताराम कालू ठेलारी, उत्तम मका ठेलारी, पवन पुना ठेलारी, माधव गोसु ठेलारी, गोतीराम ठेलारी, किशन बारसू ठेलारी, गोविंद गोपाल ठेलारी, कालू विठू ठेलारी, पंडित मिठाराम ठेलारी, वसंत मनोहर ठेलारी, उत्तम मका ठेलारी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे ठेलारी वस्ती तसेच परिसरात शिवसेनेची संघटनात्मक शक्ती अधिक दृढ झाली आहे.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, तालुका प्रमुख नवनीत पाटील, दिलीप पाटील सर, बंटी जैन, भास्कर पाटील, संतोष माळी, मोहन बेलदार, युवासेना पदाधिकारी गोलू मुऱ्हे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

तसेच मनोज पाटील, गुलाबराव पाटील, प्रमोद पाटील, विनायक पाटील, बालू पाटील, श्रीकांत पाटील, लीलाधर पाटील, डॉ. तुषार पाटील आदी मान्यवरांनीही उपस्थित राहून नवीन कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. नव्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत, आगामी निवडणुकांत शिवसेनेला अधिक बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रवेश सोहळ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसेनेचा पाया अधिक मजबूत झाल्याचे मत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तर ग्रामस्थांनी पक्षाच्या विचारधारेनुसार गावाच्या विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली.