गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम हा online zoom app द्वारे घेतला गेला.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धनंजय धनगर यांचे Express Yourself या विषयावर online व्याख्यान घेण्यात आले. धनंजय धनगर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की व्यक्तिमत्त्व विकास हा खूप महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यावेळी त्यांनी ABC rule विद्यार्थ्यांना सांगितला. ABC rule म्हणजे (Appearance, Body language, Communication) यांचा योग्य वापर करून तुम्ही तुमचा व्यक्तिमत्त्व सुधारू शकतात असे त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी सांगितले. सदर व्याख्यानाला भरपुर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री पाटील यांनी केले. तांत्रिक साहाय्य मयुर पाटील यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.चारुशीला चौधरी, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक उपस्थित होते.

 

Protected Content