भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बलशाली लोकशाहीच्या निर्मितीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदान करणे हा जसा आपला अधिकार आहे तसा कर्तव्याचा सुद्धा भाग आहे. प्रतेक भारतीय नागरिकाने मतदार नोंदणी करून मतदान केलेच पाहिजे ती काळाची गरज आहे.सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक नागरिक बनवण्यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी केले. सेकंडरी एड्युकेशन सोसायटी संचालित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभागातर्फे 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अदयक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे होते. प्रसंगी बलशाली भारतासाठी मतदान आवश्यक या विषयावर प्रा सुनील नेवे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे म्हणाले की, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यानी मतदार नोंदणी करावी व आपल्या परिसरातील नागरिकांची मतदार नोंदणी करावी आणि भारतातील लोकशाही सदृढ सशक्त करावी. गावागावात जावून मतदान जागृती करावी.
25 जानेवारी हा दिवस महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे साजरा करण्यात आला. दिशा वारके व स्वाती सुरवाडे या विद्यार्थिनींनी अत्यंत मोहक अशी मतदान जागृती या विषयावर रांगोळी रेखाटली . प्रा डॉ. सुनील नेवे यांचे व्याख्यान संपन्न झाले, तसेच या प्रसंगी निबंध स्पर्धा आयोजित केली गेली. या निबंध स्पर्धेत एकूण 32 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला . सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तसेच प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ असे पारितोषिक दिले जाणार आहे. लोकशाहीत मतदानाचे महत्व हा विषय निबंध स्पर्धेचा होता.
या निमित्ताने ऑनलाइन प्रशंमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. गुगलफॉर्म वर विद्यार्थ्यांना ही प्रश्नमंजुषा सोडवायची होती. या स्पर्धेत ही विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये एकूण 10 प्रश्न विचारलेले होते. विजेत्या स्पर्धकांना परितोषिक दिले जाणार असून प्रतेक सहभागी विद्यर्थ्याला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
यावेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थित शपथ घेण्यात आली. “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.” अशी शपथ घेण्यात आली.
या दिवसाचे निमित्ताने भालोद गावातील ग्रामस्थांना प्रत्यक्ष भेटून त्यांना मतदार नोंदणी चे महत्व विद्यार्थ्यानी पटवून दिले तसेच मतदान करणे का आवश्यक आहे हे समजावून संगितले. मतदान जागृति विषयक पत्रक प्रतेक घरात विद्यार्थ्यानी वाटप केले. या अभियानामध्ये नेहा बरडे, राजश्री महेश्री, किशोर महाजन, गिरीश चौधरी, युवराज बाणाईत, कुणाल कोळी, खिनिल ढाके, सागर सोनवणे, जयेश सोनवणे, नीलेश सपकाळे हे विद्यार्थी सहभागी झाले .
या संपूर्ण कार्यक्रमाला प्राचार्य डॉ किशोर कोल्हे, उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे, प्रा. डॉ. जतिनकुमार मेढे, प्रा. डॉ. अजयकुमार कोल्हे, प्रा. डॉ. दिनेश पाटील, प्रा. डॉ. आशुतोष वर्डीकर, प्रा. डॉ. दिनेश महाजन, प्रा. डॉ. मीनाक्षी वाघूळदे, प्रा. मोहिनी तायडे, प्रा. डॉ. किरण चौधरी, प्रा. हेमंत इंगळे, प्रा. हेमलता कोल्हे, प्रा. डॉ. देवेंद्र बोंडे, चंद्रकांत लोखंडे हे उपस्थित होते.