बोदवड न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड येथिल  दिवाणी व फौजदारी न्यायालयात आज सकाळी राष्ट्रीय  लोक अदालीतीचे आयोजन सर्वाच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आले.

या कार्यक्रमात ऍड अर्जुन पाटील राष्ट्रीय लोक अदालतीचा उद्देश व ध्येय या विषयावर विचार मांडले. या संदर्भात ते म्हणाले की, सर्वांनी सांमजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवण्याची गरज आहे. भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्रातच आनंद खरा या विचार पंक्तीचा अंवलब न्यायालयीन वाद मिटवण्यासाठी आजही गावातील जुनीजाणती माणसे एकत्र येत गावात कुठल्याही स्वरूपाचा वाद समजुतीने मिटवतात. ज्यांच्यापुढे वाद नेला जातो, ती गावातील नि:पक्षपाती लोक असत. यालाच ‘गाव-पंचायत असेही म्हटले जाते. ‘लोकन्यायालय’ म्हणजे या गाव पंचायतीचेच आधुनिक रूप म्हणून ओळखले जाते. जेथे कायद्याचा अभ्यास असणारे नि:पक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्यासमोर येणार्‍या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय तडजोड घडवीत असते.  वादापेक्षा समोजता केव्हा ही बरा त्यामुळे आपसातील सबंध कायम राहताता असे सांगितले.

दरम्यान, दुरावलेले संबंध, प्रलबित असलेली प्रकरणे दाखलपुर्व प्रकरणे मिटविण्याकरीता महाराष्ट्रातील उच्च न्यायालय व खंडपीठे, सर्व जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये व इतर न्यायाधीकरणे यांनी लोकाच्या हितासाठी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.क्यु.ए.एन. सरवरी होते. कार्यक्रमास मंचावर प्रमुख उपस्थिती  बोदवड तालुका वकिल संघाचे अध्यक्ष अर्जुन टी. पाटील, धनराज सी. प्रजापती, संतोषकुमार कलंत्री, एन. ए.लढे हे होते.

तसेच यावेळी वकील संघा कडुन तालुक्यातील राष्ट्रीय बॅकेचे, वीज महामडंळ, महसुल विभाग अधिकारी वर्ग तसेच के.एस.इंगळे, मिनल अग्रवाल, सी.के पाटील, मुकेश पाटील,विधी प्राधिकरण  योगेश पाटील, शैलेश पडसे, पक्षकार वर्ग, पो.कॉ. आर.डी.महाजन, हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन धनराज सी. प्रजापती यांनी केले.

Protected Content