अखेर बोदवडच्या सहायक निबंधक कार्यालयात साजरी झाली शिवजयंती

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील सहायक निबंधक कार्यालयात आज दुपारी शिवजयंती साजरी करण्यात आली. कर्मचार्‍यांना येण्यास उशीर झाल्याने दुपारी शिवजयंती साजरी करण्यात आल्याची माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये शिवजयंती साजरी करणे बंधनकारक आहे. यानुसार आज सर्व शासकीय कार्यालयांमधून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. मात्र येथील सहायक निबंधक कार्यालयात सकाळी शिवजयंती साजरी न करण्यात आल्याने संभ्रमाचे वातावरण निर्मित झाले होते. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरील वृत्ताची दखल घेण्यात आली.

या अनुषंगाने दुपारी कर्मचार्‍यांनी शासकीय परिपत्रकानुसार शिवजयंती साजरी केली. याप्रसंगी कर्मचारीवृंद उपस्थित होता.

Protected Content