राष्ट्रीय महामार्गाची चाळणी; खड्डे चुकवताना होणारे अपघात वाढले

पारोळा प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची अक्षरश: चाळणी झाली आहे. महामार्गावरील खड्डे चुकवताना होणारे वाहनाचे अपघात वाढले आहेत. काही चूक नसताना कित्येक निरपराध लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे.अपघातांच्या या मालिका सुरूच आहेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या महामार्गावरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

तीन-चार वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कमालीचे रखडले आहे. हे काम अतिशय धीम्या गतीने व अधून मधून सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची रोजची ये जा आहे.पावसाला सुरवात झाली तेव्हा पासून महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्या खड्यांनी आता मोठे रूप धारण केले आहे. अचानक वाहन त्या खड्यातून गेल्यास वाहन अनियंत्रीत होऊन अपघात होत आहे. विशेष करून दुचाकी चालकसाठी ते अतिशय धोकादायक ठरले आहेत. हे खड्डे चुकविनाता वाहना वाहनात अधून मधून लहान मोठे अपघात देखील होत आहे.

जळगाव ते धुळे महामार्ग खड्डेमय झाला आहे. मध्यंतरी खड्ड्यामध्ये मुरूम टाकून किरकोळ दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावर पाऊस पडल्या नंतर ते खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत. या खड्ड्यांची डांबर व खडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. परन्तु संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत जाणार आहे. याची खासदार उमेश पाटील यांनी दखल घेऊन महामार्ग तात्काळ दुरुस्ती संदर्भात यंत्रणेस भाग पाडावे अशी मागणी होत आहे.

Protected Content