मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज राष्ट्रीय ग्राहक दिन आणि साने गुरुजी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एच.ए.महाजन तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. व्ही.एस. श्रावगे (वाणिज्य विषयाचे अभ्यासक) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्रावगे यांनी ग्राहकांचे हक्क आणि अधिकार याविषयी विद्यार्थ्यांना उद्बोधन केले.
तसेच ग्राहकांनी कोणत्याही वस्तूची खरेदी करताना डोळसपणे वस्तूच्या उत्पादनाची खात्री केल्यानंतर खरेदी करावी. आधुनिक काळात ऑनलाइन शॉपिंग करताना खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, कारण आपली फसवणूक होण्याची शक्यता असते तेव्हा आपण जागो ग्राहक जागो या प्रक्रियेत सामील झाले पाहिजे असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात महाजन यांनी प्रत्येक शिक्षकाने साने गुरुजींच्या विचाराचा आणि कृतीचा अवलंब आत्मसात करून आदर्श शिक्षक बनले पाहिजे.यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या गावामध्ये ‘जागो ग्राहक जागो’ या कार्यक्रमाची जनजागृती करावी. तसेच साने गुरूजींचे श्यामची आई हे पुस्तक निश्चितपणे वाचावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. अनिल पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.संजीव साळवे, प्रा. डॉ.प्रतिभा ढाके,एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा.डाॅ.छाया ठिंगळे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. खडसे, प्रा. पहुरकर, प्रा. विद्या पाटील, ग्रंथालयाचे अधीक्षक प्रा.सरोदे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस अधिकारी प्रा. विजय डांगे, प्रास्ताविक प्रा. डॉ. दीपक बावस्कर आणि आभार प्रदर्शन कुमारी सपना वंजारी हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल भारंबे, तेजस सरोदे,भाग्यश्री बोराखडे, ज्ञानेश्वर शेळके, ऋषिकेश सूर्यवंशी, शितल भोई, आणि वृषाली सरोदे इत्यादी एनएसएस स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.