रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार बंडू कापसे यांनी उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन करतांना सामान खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तसेच फसवणूक झाल्यास कुठे तक्रार करावी याबद्दल मार्गदर्शन केले.
रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार बंडू कापसे आणि निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम पुरवठा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुरवठा अधिकारी डाळिंबी सरोदे, मंडळ अधिकारी दीपक गवई, ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी उपस्थित ग्राहकांना विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्राहकांची उपस्थिती होती. तहसीलदार बंडू कापसे यांनी ग्राहकांना वस्तू खरेदी करताना वस्तूची गुणवत्ता, किंमत, पॅकेजिंग, आणि बिलाची तपशीलवार माहिती तपासण्याचे महत्त्व सांगितले. तसेच, फसवणूक झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार कशी नोंदवावी याच मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्राहकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतल्या बद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे ग्राहकांमध्ये जागरूकता वाढण्यात मदत झाली.