Home Cities जळगाव टोल बंद करा अन्यथा आंदोलन : मनसेचा इशारा

टोल बंद करा अन्यथा आंदोलन : मनसेचा इशारा

0
28

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही सुरू असतांना होणार्‍या टोल आकारणीला मनसेने विरोध केला आहे.

जिल्ह्यात तरसोद फाटा ते चिखली दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३चे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावर वृक्षारोपण न करताच नशिराबाद टोलनाका सुरू करून चालकांकडून वसुली केली जाते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याला विरोध केला आहे. या अनुषंगाने पक्षातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून टोल बंद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तर, आठ दिवसात टोल बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकूंदा रोटे यांनी निवेदन दिले आहे.


Protected Content

Play sound