Home Cities जळगाव भादली रेल्वेगेट सुरू करा अथवा गांधिगिरी ! : पंकज महाजन

भादली रेल्वेगेट सुरू करा अथवा गांधिगिरी ! : पंकज महाजन

0
61

जळगाव प्रतिनिधी । भादली येथील रेल्वेगेट सुरू न झाल्यास आपण गांधीगिरी प्रकारातील आंदोलन करणार असल्याचा इशारा नशिराबाद येथील माजी सरपंच पंकज महाजन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

भादली रेल्वे स्थानकाजवळील दोन वर्षापासून बंद गेट आणि रेल्वे पुलाचे काम लवकर पूर्ण होत नसल्याने शेतकर्‍यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे माजी सरपंच पंकज महाजन यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांना निवेदन देऊन ही समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.

भादली रेल्वे स्टेशन जवळील गेट दोन वर्षांपासून रेल्वे अंडरपास ब्रिजच्या (आरयुबी) कामासाठी बंद आहे. त्यामुळे तीन ते चार किमी फेर्‍याने जावे लागते. हे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. प्रचंड गैरसोय होत असल्याने शेतकर्‍यांना हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करून द्यावा. अन्यथा येत्या २० मार्चला भादली रेल्वे स्थानकात सकाळी ११ पासून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पंकज महाजन यांच्यासोबत बरकत अली यांनीही हे निवेदन दिले आहे.


Protected Content

Play sound