नाशिक प्रतिनिधी । शहरात विविध भागात पार्किंग नसल्याने मिळेल त्या ठिकाणी वाहन पार्किंग केली जातात. यासाठी वाहनांना दंडात्मक कारवाईसाठी वाहन बांधण्याचे विशेष कंत्राट पोलिसांनी दिले होते. मात्र, ठेकेदारांकडून नियमांचं पालन होत नसल्याने नागरिकांचा रोष पाहून पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिकमधील वाहनांचे टोईंग बंदीला नुकतीच स्थगिती दिली.
नाशिक शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी पार्क केल्या जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची टोईंग केली जात होती. याचवेळी पोलिसांकडून वाहनांवर दंडात्मक कारवाईसाठी वाहन टोईंगसाठी खास ठेका देण्यात आला होता. टोईंग करणाऱ्या ठेकेदाराला याबाबत विशिष्ट नियमावली ठरवून दिले होते. मात्र ठेकेदार या नियमांचं पालन करत नसल्याने नाशिक पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. या कारवाईमुळे अनेकदा नाशिक पोलिसांचे आणि नागरिकांचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. पोलिसांनी वारंवार टोईंगकडे लक्ष देऊनही यात कोणतीही सुधारणा होत नव्हती. म्हणून नाशिक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी टोईंगलाच स्थगिती दिली. तसेच येत्या काळात वाहतूक शिस्त बघून निर्णय घेतला जाईल अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. या स्थगितीमुळे ऐन सणासुदीच्या काळात वाहतुकीचे नियोजन करण्याचे आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे.