मुंबई प्रतिनिधी । विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चर्चा केली.
विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी खडसे व त्यांची कन्या तथा जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर दोन्ही मान्यवरांमध्ये अनौपचारीक चर्चा झाली.
एकनाथराव खडसे यांचे नाव राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यासाठी राष्ट्रवादीच्या कोट्यातून आधीच नामनिर्देशीत करण्यात आले असून अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या सुरू असणार्या विधीमंडळ अधिवेशनाच्या नंतर तरी यावर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.