ग्रामपंचायत निवडणुकीच्या नंतरच सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत !

मुंबई प्रतिनिधी । राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या नंतरच सरपंचपदच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून जिथे आधी सोडती काढण्यात आल्याय त्या रद्द होणार असल्याचा महत्वाचा निर्णय ग्रामविकास खात्याने जाहीर केला आहे.

राज्यातल्या १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाची सोडत जाहीर होत होती. पण सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढल्यामुळेच नवा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच १४ हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

नवीन निर्णयानुसार राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या नंतरच सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून जिथे आधी सोडती काढण्यात आल्याय त्या रद्द होणार असल्याचा महत्वाचा निर्णय ग्रामविकास खात्याने जाहीर केला आहे.

राज्यातल्या ३४ जिल्ह्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होईल. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.

Protected Content