यावल प्रतिनिधी । येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, क्रीडा विभाग व आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक क्रीडा दिनानिमित्ताने ऑनलाइन राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून नरेंद्र रावते याने प्रथम तर नेहा गायकवाडने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धतुन विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व चौफेर वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरिय स्पर्धेत राज्यातुन सुमारे २२५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धचे निकाल जाहीर करण्यात आले. स्पर्धत प्रथम क्रमांक नरेंद्र रावते (जळगाव) याने पटकावला. द्वितीय क्रमांक नेहा गायकवाड (पुणे), तृतीय क्रमांक भाग्यश्री सोनार (धुळे) तसेच उत्तेजनार्थ उषा पावरा(नाशिक) व महेंद्र चव्हाण (नंदुरबार) यांनी प्राप्त केला. ही स्पर्धा प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन डी. एन. मोरे यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार क्रीडा विभाग प्रमुख डॉ.पी. व्ही. पावरा, IQAC विभाग प्रमुख प्रा. एस. आर. गायकवाड यांनी विशेष सहकार्य केले.