यावल वनविभागाच्या कारवाईत चारचाकी वाहनासह लाखाचे अवैध लाकूड जप्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वन विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या धडक कारवाईत अवैद्यरित्या कटाई केलेल्या लाकुडाची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह लाखांचा माल जप्त करण्यात आले असुन वाहनचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अनुसार ११ जुन रोजी रात्रीच्या सुमारास वन विभागास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वनविभागाने सापळा रचुन यावल शहरातील फैजपूर रस्ता मनुदेवी मंदिर जवळ टाटा कंपनीचे ३११८ या वाहन क्रमांक एमएच १८ बिजी २१५३ या चारचाकी वाहनाची चौकशी केली असता या मध्ये विनापरवाना अवैध लाकूड भरलेले दिसून आले. वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक संदर्भात परवाना मिळून आला नाही. या वेळी वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने चारचाकी वाहन मुद्देमालासह लाखांचा अवैद्यरित्या कटाई केलेला लाकुड पुढील चौकशी साठी ताब्यात घेऊन शासकीय मुख्य विक्री केंद्र यावल येथे आणून जमा केले.

निम जळावू लाकूड घ.मी. ३५ ,०० मिळुन आलीत वनविभागाने या गुन्हे प्रकरणी भारतीय वन अधिनियम१९२७चे कलम ४१ (२) ब, ४२ ,५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कार्यवाहीत आनंदा पाटील, वनपरीक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल, रमेश थोरात वनपाल, रानुदास जाधव वनपाल, आनंद तेली, वाहन चालक यांच्या पथकाने यात सहभाग घेतला. सदर कार्यवाही ही नीनू सोमराज वनसंरक्षक धुळे, जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव, राजेंद्र सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे, प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्प यावल यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Protected Content