मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून उद्धव ठाकरेंनी ही आघाडी केली : नारायण राणे

 

rane and thakre

 

नागपूर (वृत्तसंस्था) शिवसेनेचा जन्मच हिंदूंसाठी झाला. तर काँग्रेसही धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. या दोन पक्षांच्या विचाराधारांमध्येच फरक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ही आघाडी फक्त मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून केली आहे. राज्य, राज्याची जनता यांचा कोणताही विचार त्यांनी केलेला नाही, असाही आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

 

नागपुरातल्या अधिवेशनात त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकार आल्यानंतर कोणते निर्णय घ्यावेत? कोणते प्रकल्प असावेत? या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे होते. कोणत्याही तत्त्वाला, विचारधारेला धरुन ही महाविकास आघाडी झालेली नाही. गेल्या ५० ते ५२ वर्षांपासून ज्या विचारांवर शिवसेना सुरु होती त्या विचारांना, विचारधारेला मूठमाती देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. व्यक्तीगत स्वार्थासाठी जनतेचा एकही प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार सत्तेवर आलेले नाही. पाच दिवसाचं हिवाळी अधिवेशन झालं या पाच दिवसांच्या अधिवेशनात जनतेच्या हिताचा एकही निर्णय या सरकारने घेतला नाही. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही भाषण केलं. त्यामध्ये वापरलेली भाषा अशोभनीय होती, असाही आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

Protected Content