जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा हुडको येथील पौढाने किराणा दुकानात पहाटे गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख शाबीर शेख कादीर (वय-५५) रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असे मयताचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “शेख शबीर शेख कादीर हे पिंप्राळा हुडको येथे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करत होते.
दरम्यान, सोमवारी १८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता शेख शबीर हे उठल्यानंतर नमाज पठणाला जातो असे सांगून ते घराबाहेर पडले. बराच वेळ झाल्यानंतर ते घरी आले नाही म्हणून त्यांचा मुलगा याने किराणा दुकानात जावून पाहणी केली असता शेख शबीर यांनी दुकानातच गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. नातेवाईकांनी तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आली. या घटनेचा प्राथमिक तपास निलेश पाटील व अजय सपकाळे करीत आहे.