आता मेडिकल कॉलेजला पंतप्रधान मोदी यांचे नाव !

अहमदाबाद-वृत्तसंस्था | येथील मेडिकल कॉलेजला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एका मेडिकल कॉलेजला देण्यात येणार असून यावरून विरोधकांनी टिकास्त्र सोडले आहे.

अहमदाबादमधल्या एलजी महाविद्यालयाचं नाव बदलून नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज असं ठेवण्यात येणार आहे. अहमदाबाद महानगर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. मात्र यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. हे मेडिकल मणिनगर भागामध्ये येतं. या एलजी मेडिकल कॉलेजच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये या महाविद्यालयाचं नाव बदलून नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज असं करण्याचा निर्णय झाला. याच मणिनगर भागातून पंतप्रधान मोदी तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

दरम्यान, तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्री केटी रामा राव यांनी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्या निर्मला सीतारामन यांना वाटलं तर त्या रिझर्व बँकेला नोटेवरही महात्मा गांधींजींच्या फोटोच्या जागी नरेंद्र मोदींचे फोटो लावण्याचे आदेश देतील. केटी रामा राव यांनी याबद्दलचं ट्वीट केलं आहे.

Protected Content