नवी मुंबई प्रतिनिधी । काही दिवसांपूर्वी उरणमधील ओएनजीसीतील एका प्लांटला लागलेल्या आगीत ५ जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असताना, ओएनजीसीच्या एका प्लांटमधून रात्रीपासून नाफ्ता रसायनाची ही गळती सुरू झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओएनजीसी प्लांटमधून रात्रीपासून नाफ्ता रसायनाची ही गळती सुरू झाली. ही गळती वाढत जाऊन नाफ्ता परिसरातील नाल्यांमधून वाहू लागला आहे. आगीची घटना ताजी असल्यामुळे पुन्हा गळती झाल्याने परिसरातील गावांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने जवळचे गाव लगेचच रिकामे केले. त्याच बरोबर ओएनजीसी प्लांटच्या आजूबाजूचे सर्व मार्गही रहदारीसाठी बंद ठेवण्याता आले. याचा कोणताही वाईट परिणाम होऊ नये यासाठी तातडीने नाफ्ता पुरवठा करणारी पाईपलाइन बंद करण्याता आली आहे.