सत्यता तपासून मत व्यक्त करा : राऊतांचा भाजपला सल्ला

 

मुंबई प्रतिनिधी । धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने आरोप करून नंतर आज तक्रार मागे घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांनी सत्यता तपासून मत व्यक्त करावे असा सल्ला दिला आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरूध्द तक्रार करणार्‍या महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी त्यांची पाठराखण केली आहे. या अनुषंगाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजप नेत्यांना एक सल्ला दिला आहे. किमान अशा प्रकारात तरी माणुसकी ठेवा. सत्यता तपासून मत व्यक्त करा, तपास यंत्रणांना वेळ द्या, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो की सत्य बाहेर येऊ द्याय. राजकारण आणि समाजकारणात उभं राहण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र, एखाद्या तक्रारीवरुन उद्ध्वस्त करणं हे माणुसकीला धरुन नाही, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात फार संयमी भूमिका घेतली होती. फडणवीसांची ही भूमिका भाजपच्या अन्य नेत्यांनी समजून घ्यायला हवी. कारण चारित्र्यहनन हे राजकारणात हल्ली एक मोठं शस्त्र बनत आहे. हनीट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, राजकारण नाही. जर ते कुणी करत असेल तर ते महाराष्ट्राला डाग लावत आहेत, असंही राऊत म्हणाले.

Protected Content