पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलिस बॉईज असोसिएशनचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षपदी नदीम शेख यांची नुकतीच निवड करण्यात आली असून आ. किशोर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदैव पोलिस कर्मचारी व पोलिसांच्या पाल्यांच्या विविध समस्या विषयी तसेच सामाजिक कार्यात नेहमीच सक्रीय राहणाऱ्या जळगांव पोलिस बॉईज असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच पाचोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी शकील शेख यांचे सुपुत्र नदीम शकील शेख यांची पोलिस बॉईज असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते त्यांच्या निवासस्थानी नदीम शेख यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शहर प्रमुख किशोर बारावकर, मा. जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, शिवदास पाटील, प्रविण ब्राह्मणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, डॉ. अतुल पाटील, हर्षल पाटील, मंगल सिंग, बंटी पाटील, योगेश राठोड सह पोलिस बाॅईज असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. नदीम शेख यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.