‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम : ६०० कुटूंबियांची आरोग्य तपासणी

यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर शासन आदेशान्वये येथील नगरपा‍लिकेच्या वतीने ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ ही आरोग्य तपासनी मोहीम यावल शहरात राबवली जात असून नगर परिषदेच्या वतीने आतापर्यंत या मोहीमेअंतर्गत ६०० कुटूंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 

या मोहिम अंतर्गत आज (दि.२१) रोजी आमदार शिरीष चौधरी, तहसीलदार जितेंद्र कुवर, जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी विस्तारीत क्षेत्रातील विरार नगरातील एका कुटंबियाचे आरोग्य तपासणी प्रसंगी स्थळभेट देवून यावलकरांच्या आरोग्यांची आस्थेने चौकशी केली. नागरीकांनी कोरोना संकटकाळातीत शासन नियमांची आपल्या व आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी काटेकोर अमलबजावणी करावी, अशा सुचनाही यावेळी नागरीकांना आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी दिल्यात.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’  या आरोग्य तपासणी मोहीमेअंतर्गत शहरात घरोघरी नगर परिषदचे कर्मचारी जावून संपुर्ण कुटूंबियांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत. या आरोग्य तपासणी मोहीमे अंतर्गत ऑक्सीजन लेव्हल तपासणी व तापमापकाव्दारे ताप मोजण्यात येतो. 

या आरोग्य तपासणी मोहीम प्रसंगी  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत ब-हाटे,  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी .बी. बारेला, पंचायत समितीचे सदस्य शेखर पाटील, काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष  कदिर खान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, हाजी गफ्फार शहा, काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांच्यासह यावल नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. सदरची ही मोहीम २५आक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे नगर परिषदचे आरोग्य अधिकारी राजेंद्र गायकवाड प्रभारी नगर परिषदचे प्रभारी स्वच्छता निरिक्षक शिवांनद कानडे यांनी सांगितले.

 

 

 

 

 

Protected Content