जवानांना प्रवास थांबविण्याचे निर्देश

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून देशातील दहा लाख निमलष्करी जवानांतर जेथे आहे तेथेच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या प्रतिकारासाठी अतिशय व्यापक प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने केंद्र सरकारने लष्करातील जवानांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील १० लाख संख्येतील निमलष्करी दलांना ५ एप्रिलपर्यंत रजेतील प्रवास किंवा तुकड्यांच्या हालचाली किंवा नियमित सरावासाठीचा प्रवास तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले गेले आहेत. कोरोनाचा संसर्ग आणि प्रसार होऊ नये म्हणून सध्या जेथे आहात तेथेच राहा हा आदेश देण्यात आला आहे. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल आणि नॅशनल सिक्युरिटी गॉर्ड यांच्यासाठी हे निर्देश देण्यात आलेले आहेत. या आदेशाचा ५ एप्रिलनंतर आढावा घेतला जाणार आहे.

Protected Content