आणखी तयारीने पुढच्या महामारी विरोधातील लढाईत उतरा

जिनिव्हा , वृत्तसंस्था / दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची मृतांची संख्या वाढत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं आणखी एक इशारा वजा सल्ला दिला आहे. जगानं अधिक तयारीनं पुढील महामारीसाठी सज्ज असलं पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयसियस यांनी म्हटलं आहे.

जगातील परिस्थितीसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयसियस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भविष्यातील महामारीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहनं केलं. जिनिव्हा येथे टेड्रॉस म्हणाले, “ही अखेरची महामारी नाही. इतिहास आपल्याला शिकवतो की, महामारी आणि उद्रेक या गोष्टी जीवनातील वास्तव आहे. परंतु जेव्हा पुढची महामारी येते, तेव्हा जगानं त्याचा सामना करण्यासाठी आता आहे त्यापेक्षा अधिक सज्ज असायला हवं,” असं ते म्हणाले.

Protected Content