काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरावर ईडीचा छापा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्टरलिंग बायोटेक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. अहमद पटेल यांची चौकशी सुरु असल्याचे वृत्त देखील समोर येत आहे. अहमद पटेल हे काँग्रेसचे गुजरातमधून राज्यसभेचे खासदार आहे.

 

कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, त्यांचा मुलगा फैसल आणि जावाई इरफान सिद्दिकी हे अनेक दिवसापासून ईडीच्या रडारवर होत. ईडीने बायोटेक प्रकरणी फैसल आणि इरफान सिद्दिकीची चौकशी सुरू केली होती. स्टर्लिंग बायोटेक ही गुजरातस्थित कंपनी आहे. या कंपनीवर आंध्रा बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ईडीने अहमद पटेल यांचे जावई इरफान सिद्दिकी यांचीही चौकशी केली होती. या गैरव्यवहारात इरफान सिद्दिकी यांच्याविरोधात पुरावे मिळाल्याचा ईडीचा दावा आहे. तब्बल १४५०० कोटींच्या गैरव्यवहारात स्टर्लिंग बायोटेकचे मुख्य प्रवर्तक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा प्रमुख आरोपी आहेत. दरम्यान, अहमद पटेल १९ वर्ष माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार राहिले. अहमद पटेल यांचा गांधी घराण्याशी जवळचा संबंध आहे.

Protected Content