बोदवड सुरेश कोळी । बोदवड तहसील कार्यालयाचे जामनेर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ स्वस्त धान्याचे शासकीय धान्य गोडावून आहे. येथून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे वाहनाव्दारे धान्य पोहचविले जाते. सदरचे धान्य चांगल्या दर्जाचे असावे, ते निकृष्ट दर्जाचे नसावे याची दक्षता गोदामपालची असते. मात्र येथील शासकीय गोदामपाल श्री.दाते यांची पोलखोल झाली असल्याचे समोर आली आहे.
याबाबत अधिक असे की, तालुक्यातील सुरवाडे बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानदार एस.पी.चौधरी यांनी अन्नधान्याची उचल २९ नोव्हेंबर रोजी केली होती. त्यात गहू ९ क्विंटल ३३ किलो, तांदूळ ६ क्विंटल २० किलो यांसह त्यांतच २२ क्विंटल ९५ किलो, १५ क्विंटल २८ किलो असा एकुण ५३ क्विंटल ७६ किलो असा माल होता. मात्र सदरचा माल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचे येथील सरपंच श्रीकांत कोळी, उपसरपंच मनोहर सुरवाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी सदरचा माल परत गोदामात परत घेऊन जाण्याचे सांगितले. मात्र दाते यांना आपली पोलखोल झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सदर मालाची विल्हेवाट लावण्यासाठी आदर्शगाव मानमोडी येथील स्वस्त धान्य दुकानदार विकास पाटील येथे हा निकृष्ट दर्जाचा धान्य माल दूकानात उतरविण्यात आला होता. मात्र येथेही दातेंचा डाव फसला व नागरिकांनी हा मात्र परत करण्यासाठी गोंधळ केला असता हा निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा विल्हेवाट लावण्याचा डाव असफल झाला. संपुर्ण प्रकाराचे नागरिकांनी व्हिडिओ चित्रीकरण केलेले असून येथे दांतेची पोलखोल झाल्याचे समजते.
ज्या ठिकाणी हा माल खाली करण्यात आला पाहिजे होता. मात्र सदरचा माल निकृष्ट दर्जाचा असल्यानं नाकारण्यात आला. त्यामुळे सदरचा धान्य साठा थेट शासकीय गोदामात परत आणण अपेक्षित होते. मात्र दाते यांनी सदरचा अंत्यत निकृष्ट दर्जाचा माल परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्याचा केविलवाणा प्रयत्न का केला? यामागे नेमके कारण काय?याची संपूर्ण चौकशी होवून शासकीय गोदामपाल श्री.दाते यांना तात्काळ निलंबित करावे जेणेकरून यापुढे निकृष्ट दर्जाच्या धान्याची कोणी अनोखी शक्कल लढवून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी मागणी यावेळी येथील नागरिकांनी केली आहे.जोपर्यंत संबंधित शासकीय गोदामपाल यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही शासन दरबारी तक्रारींच्या माध्यमातून न्याय मागू असेही येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.