अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रांताध्यक्ष इद्रीस नायकवाडी यांच्या उपस्थितीत अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी अल्पसंख्याक मेळावा अमळनेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी असंख्य मुस्लिम बांधवांचा पक्षात प्रवेश झाला.
याप्रसंगी प्रस्ताविकात अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी नामदार अनिल पाटील यांनी अमळनेर मतदारसंघात अल्प कालावधीत सर्वागीण विकास करून, मोठा एतिहासिक बदल घडवत अमळनेर मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुस्लिम समाजातील लोकांना पटवून दिलं की नामदार अनिल पाटील हे मतदारसंघाच्या व राज्याच्या विकासासाठी महायुतीच्या सत्तेत सहभागी झालेले आहेत, तसे केले नसते तर अमळनेर मतदारसंघाला एवढा मोठा प्रमाणावर निधी मिळाला नसता का..? असा सवाल करताच उपस्थितांमधून टाळ्यांच्या गजरात नामदार अनिल पाटलांच्या नावाच्या जल्लोष करण्यात आला या प्रसंगी सूत्रसंचालन इम्रान खाटीक तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी केले .
राष्ट्रवादी काँग्रेस पाट अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ताहीर बेग मिर्झा, महाराष्ट्र कार्याध्यक्ष मुबीन सिध्दिकी, राष्ट्रवादी काँगेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, इम्रान खाटीक, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम सर, मुस्लिम समाजाचे नेते नासीर हाजी, सत्तार मास्टर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, आरिफ भाई खाटीक, हमीद जनाब, सुपडू हाजी, रहीम मिस्त्री, आरिफ पठाण, सय्यद अबिद अली, पप्पू खाटीक, अमळनेर अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष हारून मेवाती, शहराध्यक्ष कलीमुद्दीन शेख, फिरोज पैलवान, नावेद शेख, कालेखा पठाण, सुलतान खाटीक, बबलू खाटीक, नावेद शेख,अनिस खाटीक यांच्या सह मुस्लिम समाजाचे व शहरातील इतर कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शाहआलम नगर येथील तरुणांनी नामदार अनिल दादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येनं प्रवेश केला. त्यात प्रामुख्याने जुबेर शेख, परवेज खान, अश्फाक मिर्झा, मस्तान बेग, माजिद मिस्तरी, शाहरुख पठाण, नासिर शेख, समीर शेख, फैसल शेख, जावेद पठाण, मोहसीन पठाण, शाहरुख खाटीक, साहिल शेख, आकिब मणियार, जुबेर पठाण, अकरम शहा, निसार भाई, अप्पू शहा, जहांगीर भाई, शकील भाई, सलीम भाई, शोएब भाई, मसुउद अली, इम्रान भाई यांनी प्रवेश घेतला..!