पुण्यात कामगाराची हत्या; कारण अस्पष्ट

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे शहरातील हडपसर परिसरात हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरातील हांडेवाडी येथे रिदम सोसायटी समोर एका अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी हत्याराने डोक्यात आणि शरीरावर मारहाण करून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगारास जीवे ठार मारले आहे.
राजेंद्र रामभाऊ शेजुळे असे मृत व्यक्तीचे आहे. त्यांची पत्नी भाग्यश्री राजेंद्र शेजुळे यांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे कारण अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.

Protected Content