दारूसाठी पैसे न दिल्याने नातवासंह मुलांकडून महिलेला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे शहरातील मारहाणीमुळे हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील येरवडा परिसरात कामराजनगर येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील महिलेकडे तिच्या मुलाने व नातवाने दारु पिण्यासाठी पैसे मागितले.
परंतु सदर पैसे न मिळाल्याने मुलाने व नातवाने मिळून महिलेस बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगल मोहन नेटके असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा मयुर मोहन नेटके आणि दहा वर्षांचा नातू यांचेवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content