भिवंडीमध्ये वंचितच्या उमेदवाराला वंचितच्या कार्यकर्त्यांकडूनच मारहाण

भिवंडी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने मिलिंद कांबळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांच्याकडील एबी फॉर्म चोरून दुसऱ्याच मिलिंद कांबळे नावाच्या व्यक्तीन भिवंडीमधून वंचितचा उमेदवारी अर्ज दाखल केला. आता वंचितच्या कार्यकर्त्यांकडून मिलिंद कांबळे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. भिवंडी येथील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा मोठा गेम झाल्याचा उघडकीस आला आहे.
केवळ नावात साधर्म्य असल्याने दुसऱ्याच उमेदवारांने एबी फॉर्म चोरुन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भिवंडीमधील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यास वंचितच्याच कार्यकर्त्याकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली. पक्षाशी दिशाभूल केल्याच्या गैरसमजुतीतून वंचितच्या कार्यकर्त्याने मिलिंद कांबळे यांना मारहाण केली. मात्र, ज्यांना मारहाण करायचे होते, ते राहिले बाजुला व ज्यांच्यावर अगोदरच अन्याय झाला, त्याच मिलिंद कांबळे यांना वंचितच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.

Protected Content