किराणा दुकानातून तब्बल ४ कोटी ५२ लाखाचे अमली पदार्थ जप्त; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई

कल्याण-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कल्याण गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. उल्हासनगर शहरातील एका किराणा दुकानातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार कोटी रूपये किंमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. या दुकानाच्या मालक राजेश कुमार प्रेमचंद तिवारी याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमागील मुख्य आरोपी शैलेंद्र राकेश अहिरवार हा फरार झाला आहे.

त्याचा पोलिस शोध घेत आहे. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील गायत्री किराणा दुकानांमध्ये मोफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने किराणा दुकानात धाड टाकत ३ किलो एमडी जप्त केले, या एमडी ड्रग्जची किंमत ४ कोटी ५२ लाख २९ हजार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Protected Content