खेडीत मर्डर : पतीने पत्नीवर केले कुर्‍हाडीने वार

gardi

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खेडी भागात वास्तव्यास असणार्‍या एकाने रात्री आपल्या पत्नीवर कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, याबाबत माहिती अशी की, खेडीतील आंबेडकर नगरात राहणारे समाधान रमेश साळवे (वय ३५) व सोनी समाधान साळवे (वय -३०) दोघी रा. धारशिरी पाळधी (ह.मु. खेडी) हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे जेवण करून दोघे जण झोपले होते. पहाटे दोन वाजता समाधान साळवे आणि घरात असलेल्या लोखंडी कुर्‍हाडीने पत्नी सोनीबाई तिच्या गळ्यावर जोरदार वार करून तिची हत्या केली आहे. घटनास्थळाहून पती समाधान साळवे हा फरार झाला असून त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, संशयित आरोपी समाधान साळवे याचे वडील रमेश साळवे हा देखील खूनच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे. मयताच्या पश्‍चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे

खून झाल्याची बातमी पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. याठिकाणी एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, दीपक कांडेलकर, राजेंद्र चौधरी आदी घटनास्थळी उपस्थित होते.

Protected Content