रावेर, प्रतिनिधी । तालुक्यात मास्क न लावणा-यांवर कारवाई करू नका अश्या सूचना आम्हाला शासनाकडून मिळाल्याने महसूल विभाग विना माक्स फिरणा-या व्यक्तीवर दंडात्मकर कारवाई करणे थांबवली आहे तसेच आता ही जबाबदारी नगर पालिका व पोलिस प्रशासनची असल्याची माहीती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली.
शासनाने कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून विना मास्क फिरणा-या व्यक्तीना ५०० रुपये दंड आकारला जातो. सुरवातील महसूल विभाग,नगर पालिका व पोलिस प्रशासन यांनी विना माक्स फिरणा-या व्यक्तीवर कारवाई करत दंड वसूल केला. परंतु, शासनाने ही जबाबदारी आता नगर पालिका व पोलिस प्रशासनावर असल्याचेही तहसीलदार म्हणाल्या. त्यामुळे महसूल विभाग यातून वगळल आहे.
तालुक्यात आतापर्यंत विना मास्क फिरणा-या कडून ५ लाख ६५ हजार ९५० रुपये वसूल केले आहे. ही रक्कम फक्त महसूल विभाग व पोलिस प्रशासनाची आहे. यामध्ये दोन महिन्यांपूर्वी २१ जुलै महसूल विभागाने शेवटचा दंड केला आहे. त्यांनी ८५ हजार ६५० रुपये विना माक्स फिरणा-यां कडून वसूल केले आहे. तर निंभोरा पोलिस स्टेशन २२ हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे. जिल्हात सर्वाधिक दंड ४ लाख ५७ हजार ९०० रुपये रावेर पोलिसांनी वसूल केले आहे असे एकूण ५ लाख ६५ हजार ९५० रुपये विना माक्स फिरणा-यांन कडून दंड वसूल केला आहे.