पंतप्रधान मोदींची सिरम इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांबरोबर चर्चा

पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटला भेट देऊन वैज्ञानिक आणि अधिकार्‍यांबरोबर कोरोनाच्या लसीबाबत चर्चा केली. 

कोरोनाची लस केव्हा येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगभरात अनेक कंपन्या याच्या लसीवर काम करत आहेत. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीची निर्मिती सिरम इन्स्टीट्यूट करत आहे. या अनुषंगाने आज पंतप्रधान मोदी यांनी सिरमला भेट दिली. सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी पूनावाल कुटुंबीय तिथे उपस्थित होते. 

सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सीईओ अदर पूनावाला यांनी मोदींनी सिरमची कार्यपद्धती समजावून सांगितली. मोदींनी यावेळी करोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.

 

Protected Content