मुंब्रा येथील हॉस्पीटलला आग; चार रूग्णांचा मृत्यू

ठाणे । विरार येथील रूग्णालयातील दुर्घटनेमुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच मुंब्रा येथील हॉस्पीटलला आग लागून यात चार रूग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

मुंब्रा शहरातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम क्रिटिकेयर सेंटर या रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये 14 तर अतिदक्षता विभागात सहा रुग्णांवर उपचार सुरु होते. पहाटे पावणे चारच्या सुमारास रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अग्शिमन दलाने ही आग विझवली. आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

रुग्णालयात आग लागली तेव्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने रुग्णांना इतरत्र हलवले. यास्मिन शेख ( 46 वर्षे), नवाब शेख (47 वर्षे), हलिमा सलमानी (70 वर्षे), हरीश सोनावणे (57 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.