आसामला भूकंपाचे हादरे

गुवाहाटी वृत्तसंस्था । आसाम राज्यातील अनेक ठिकाणी आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले असून यातील हानीची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.

आसाम राज्यातील अनेक भागांना आज सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले. अचानक जमीन हलू लागल्याने अनेक ठिकाणी हलकल्लोळ उडाला. काही मिनिटांच्या अंतराने भूकंपाचे दोन धक्के बसल्याची माहिती आता समोर आली आहे. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ६.४ इतकी नोंदविण्यात आली असून यामुळे काही ठिकाणी हानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसामला भूकंपाचा मोठा झटका बसल्याचे सांगितले. तसेच सर्व नागरिक सुरक्षित असल्याची मी प्रार्थना करतो. याचसोबत लोकांना सावध राहण्याची सूचना करत आहे. अन्य जिल्ह्यांमधून मी भूकंपाच्या तिव्रतेची माहिती घेत आहे, असे म्हटले.

Protected Content