वानखेडे मैदानावर संरक्षण पुरवण्यास मुंबई पोलिस असमर्थ

Wankhede Police

मुंबई वृत्तसंस्था । वेस्ट इंडिजच्या भारत दौर्‍याचा पहिला सामना संकटात सापडला आहे. वेस्ट इंडिजचा सामन्याला ६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच या दौर्‍यादरम्यान दोन्ही संघ दोन टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळतील. पहिला टी -२० सामना ६ डिसेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे मैदान येथे खेळला जाईल, परंतू मुंबई पोलिस सामन्यासाठी सुरक्षा पुरविण्यात असमर्थता दर्शवित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी पहिल्या टी-२० सामन्याला सुरक्षाव्यवस्था पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे. ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. नुकत्याच आलेल्या अयोध्या निकालावरुन हा दिवस मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे. याचसोबत ६ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी लाखो अनुयायी मुंबईत दाखल होतात. त्यामुळे मुंबईतला सामना दुसऱ्या ठिकाणी खेळवण्यात यावा, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या प्रतिनिधीने नुकत्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हजेरी लावली होती. या बैठकीत मुंबई पोलिसांची बाजू स्पष्ट करण्यात आली.

Protected Content