मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील संताजी नगरातल्या महिलेची चोरट्यांनी धुम स्टाईल मंगलपोत लांबविणार्याच्या मुसक्या मुक्ताईनगर पोलिसांनी आवळल्या असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर शहरातील संताजी नगर भागातल्या रहिवासी प्रज्ञा प्रदीप तळले या महिलेची मंगलपोत धुम स्टाईल लांबविण्यात आल्याची घटना १३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली होती. यात त्यांच्याकडील सुमारे सात ग्रॅम वजनाच्या सोन्याचे मणी असलेल्या व ३० हजार रूपये मुल्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी लाल रंगाच्या मोटारसायकलीवरून पलायन केले होते. या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात १४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, मुक्ताईनगर स्थानकाचे पोलीस निरिक्षक नागेश मोहिते आणि उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे व त्यांच्या सहकार्यांनी तपासाची चक्रे फिरवली. यात अकोला पोलीस स्थानकातील दाखल गुन्ह्यातल्या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने मुक्ताईनगर तसेच परिसरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती दिली. या अनुषंगाने संजय ब्रिजमोहन चोकशे, रा. तिल्लोर खुर्द ता. जि. इंदौर (म. प्र.) आणि शंकर फुलचंद भदोरीया , बय ३४ , रा.छोटी नदी , पंधाना रोड खंडवा जि, खंडवा म.प्र. ह.मु. किनखेड पुर्णा ता. आकोट जि.अकोला या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या आरोपींची कसून चौकशी केल्यावर त्यांनी मुक्ताईनगर तसेच भुसावळ येथील दाखल गुन्ह्यातील सुमारे दीड लाख रूपये बाजारमूल्य असणारे ३५ ग्रॅम सोन्याचा ऐवज देखील काढून दिला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी; अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते , व उप विभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पो.नि. नागेश मोहीते , पोउप निरी प्रदीप शेवाळे ,पो.ना. मोतीलाल बोरसे ,पोना. निलेश श्रीनाथ , पो.अं. गजानन जाधव पो.अं. विशाल पाटील यांच्या पथकाने पार पाडली.