मुक्ताईनगर-पंकज कपले | मुक्ताईनगरातील एक मोठा पदाधिकारी हा लवकरच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील एक मोठा पदाधिकारी जळगाव येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली. जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात हा प्रवेश सोहळा होणार आहे. या संदर्भात, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात नाव न सांगण्याच्या अटीवर लवकरच सोहळा होणार असल्याची माहिती दिली.