मुक्ताईनगर तालुक्यात तरूणाचा संशयास्पद मृत्यू 

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मधापुरी येथे एका तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसानी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

मधापुरी हे कुर्‍हा काकोडा जवळचे लहानसे गाव असून येथे नितेश पवार ( वय अंदाजे ३०) हा तरूण राहतो. त्यांची पत्नी ही त्याच्याकडे राहत नसल्याने तो सध्या आपल्या आईसह राहत होता. काल रात्रीच्या सुमारास त्याच्याकडे काही जण आल्याचे परिसरातील लोकांनी पाहिले होते. यानंतर आज सकाळी त्याचा मृतदेह आढळूून आला. त्याच्या पार्थिवावर मारहाण केल्याच्या काही खुणा आढळून येत असल्याने नितेश पवार याचा घातपात करण्यात आल्याचा संशय बळावला आहे.

दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येत असून यातच त्याचा घातपात झाला की नाही ? याबाबतची माहिती मिळणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुक्ताईनगर पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदनाच्या रिपोर्टनुसार एफआयआर नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास मुक्ताईनगर पोलिस स्थानकाचे निरिक्षक शंकरराव शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content