मुक्ताईनगर Muktainagar प्रतिनिधी । सिंदखेडराजा जवळ कारला ट्रकने दिलेल्या धडकेत काँग्रेसचे जिल्हा सचिव आसीफ खान इस्माईल खान यांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.
याबाबत वृत्त असे की खाजगी काम आटपून औरंगाबाद येथून मुक्ताईनगर कडे परत येत असताना बुलढाणा buldhana जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ कार व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात आय ट्वेंटी कार मधील मुक्ताईनगर येथील काँग्रेसचे जिल्हा सचिव आसिफ खान इस्माइल खान यांचा मृत्यू झाला आहे.
याच अपघातात काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांच्यासह अॅडव्होकेट संतोष इंगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची वार्ता येताच राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.