स्नॅचिंग, घरफोडी आणि दुचाकी लांबविणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात मोबाइल्स स्नॅचिंग, घरफोडी आणि दुचाकींची चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला शिवाजी नगर हुडको परिसातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संशयित आरोपीने ७ गुन्ह्याची कबुली दिली आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात गेल्या महिनाभरात मोबाईल स्नॅचिंग, घरफोडी आणि दुचाकी चोरीचे गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. या गुन्ह्यांचा छडा लावण्यात संदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तपासाबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक बकाले यांनी एक स्वतंत्र पथक तयार करून त्यात सपोनि जालिंदर पळे,  सहाय्यक फौजदार युनूस शेख, अशोक महाजन संदीप सावळे, पोलीस नाईक अविनाश देवरे, रवींद्र पाटील, दीपक शिंदे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, सहायक फौजदार राजेंद्र पवार यांची नेमणूक केली.

 

पथकाला संशयित आरोपी हा युसुफ शेख उर्फ चिल्ल्या रा. शिवाजी नगर, हुडको जळगाव हा शहरातील चोरी करत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवार १४ मार्च रोजी दुपारी कारवाई करत संशयित आरोपी युसुफ शेख उर्फ चिल्या याला शिवाजी नगरातून सोमवारी १३ मार्च रोजी दुपारी अटक केली. तीन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.  संशयित आरोपी युसूफ शेख उर्फ चिल्या शेख याने मोबाईल स्नॅचिंग -२,  घरफोडी-२ आणि दुचाकी चोरीचे -३ असे एकुण ७ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.  याबाबत पुढील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content