मुक्ताईनगर प्रतिनिधी । केळी पीक विम्याचे निकष बदलण्याची मागणी मान्य करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासदार रक्षाताई खडसे यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे.
खासदार रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची भेट घेतली. खान्देशातील केळी पीक विमा उत्पादकांचा असलेला केळी पीक विमा योजनेचे प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाईच्या निकषातील बदलामुळे शेतकर्यांचे होणारे नुकसान याबाबत माहिती दिली. यावेळी कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ.आशिषकुमार भुतानी यांनी, राज्य सरकारने प्रस्तावित केलेली केळी पीक विम्याच्या अंबिया बहारसाठी नवीन पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना प्रमाणके, नवीन निकष लवकरच मंजूर केले जातील, अशी हमी दिली.
पीक विम्याचे निकष पूर्वीचेच ठेवण्याची मागणी केळी उत्पादकांकडून केली जात होती. आता हे निकष आधीप्रमाणे करण्यात येतील असे संकेत मिळाले आहेत. यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांचा पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.