मुक्ताईनगरचे उच्चशिक्षीत व सज्जन आमदार विकासनिधी परत नेतात ! : खडसेंचा टोला

Muktainagar मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात देखील उच्चशिक्षित व सज्जन आमदार मतदार संघात आलेला विकासाचा निधी परत नेतात, कामांवर स्थगिती आणतात’, असे नमूद करत आ. एकनाथराव खडसे यांनी आ. चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेख न करता त्यांना टोला मारला आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत त्यांनी जोरदार टिकास्त्र सोडले.

आमदार Chandrakant Patil चंद्रकांत पाटील आणि Eknath Khadse आमदार एकनाथराव खडसे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य हे कुणापासून लपून राहिलेले नाही. हे दोन्ही नेते एकमेकांवर टिका-टिपण्णीपासून ते टोमणे-टोले मारण्याची एकही संधी सोडत नाहीत. नेमक्या याच अनुषंगाने रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खडसे फार्म हाऊसवर झालेल्या विधानसभास्तरीय बैठकीत एकनाथराव खडसे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

याप्रसंनी नाथाभाऊ म्हणाले की, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात देखील उच्चशिक्षित व सज्जन आमदार मतदार संघात आलेला विकासाचा निधी परत नेतात, कामांवर स्थगिती आणतात. केवळ आपण मराठा समाजाला मुक्ताईनगरात एक एकर जमीन दिल्याने आमदारांनी तेथे समाज मंदिर बांधले नाही असा आरोप करत त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा उल्लेख टाळून टिकास्त्र सोडले. आता यावर आमदार चंद्रकांत पाटील हे देखील जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

याच कार्यक्रमात एकनाथराव खडसे यांनी राज्यातील विद्यमान सरकार हे जास्त काळ चालणार नसून मध्यावधी निवडणूक अटळ असल्याचे भाकीत केले. तसेच, राज्यात सत्तेसाठी पोरखेळ सुरू असल्याची टीका देखील केली. या बैठकीला पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील, जिल्हा बँक संचालिका ऍड.रोहिणी खडसे खेवलकर, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content