जादा बिले आकारणाऱ्या खासगी कोवीड सेंटरवर दंड आकारला जाईल – खा.रक्षा खडसे (व्हिडीओ)

मुक्ताईनगर पंकज कपले । कोरोनाच्या आपत्ती काळात कोवीड सेंटर बंद ठेवणे योग्य नाही. परंतू कोवीड रूग्णांकडून जादा बिले आकारणाऱ्या खासगी कोवीड सेंटरवर भविष्यात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रशासनाकडे करणार आहे. अशी ग्वाही खासदार रक्षा खडसे यांनी केले. मुक्ताईनगरात भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाच्या वतीने महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलतांना खा. खडसे म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाचे सावट अधिक प्रमाणावर असल्यामुळे भारतीय जनत पार्टीने वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला मदत करण्यासाठी तत्पर असून यासाठी रक्तदान शिबीर हा देखील याचाच भाग आहे. भविष्यातही भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा कायम मदत करण्यासाठी तत्पर राहणार असू अशी ग्वाही खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना दिली.

तर  बेटी बचाओ-बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात कोरोना रूग्णांसाठी रक्ताची अधिक आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पाटील, युवा मोर्चा आणि गोळवलकर रक्तदान पेढीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिवसभरात किमान २५ रक्ताच्या बाटल्या संकलन करण्याचा संकल्प असून २५ रक्तदाते असे दोन टप्प्यात हे रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. बेटी बचाओ-बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, खासदार रक्षा खडसे, माजी जि. प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, समाजकल्याण सभापती जयपाल बोडदे, नगराध्यक्षा नजमाताई तडवी,तालुकाध्यक्ष प्रफुल जवरे, युवा मोर्चा अध्यक्ष अंकुश चौधरी, सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, युवा मोर्चा विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, विनोद पाटील, पियुष महाजन नगरसेवक, मुकेश वानखेडे नगरसेवक, नगरसेवक बबलू कोळी, नगरसेवक ललित महाजन, के.डी.वंजारी, विजू काठोके, भैया पाटील, सोमनाथ पाटील, पवन पाटील, रहस्य महाजन आदी उपस्थित होते.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.