यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुंबई येथे मातोश्रीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते माजी मंत्री व खासदार सुभाष देसाई, शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, विधान परिषद विरोधी पक्ष नेतेअंबादास दानवे, सुनिल प्रभू, शिवसेना अंबरनाथ संपर्क प्रमुख मनोज वारंग इत्यादी शिवसेना नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री मुंबई येथे शिवबंधन बांधुन पारधी समाजाच्या राजकीय सामाजिक विकासासाठी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांच्यासह राज्यातील संघटनेच्या शेकडो पदाधिकारी यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले कि गेल्या ७५ वर्षां पासून पारधी समाजाला कोणीही प्रतिनिधित्व दिले नाही व पारधी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे. येत्या काळात शिवसेना पक्षाच्या वतीने पारधी समाजाला योग्य सन्मान देऊन न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यांनी पारधी समाज बांधवांना दिले. या प्रसंगी जळगाव, बुलढाणा,धुळे, नंदुरबारसह राज्यातील विविध ठिकाणाहून आलेले शेकडो पारधी समाज बांधव उपस्थित होते.