धनंजय मुंडे रात्री साडेबाराच्या सुमारास फडणवीस यांच्या भेटीला

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, “गुरुवार दि. ३० जून रोजी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुरुवातीला फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळात राहणार नसल्याचे सांगत शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असे सांगितले होते. मात्र नड़्ड़ा आणि अमित शहा यांनी सांगितल्यामुळे ते उपमुख्यमंत्री झाले.

याच रात्री साडेबाराच्या सुमारास फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीचं कारण आणि भेटीमधील तपशील अद्याप कळू शकलेले नसले तरी ते अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याने या भेटीत भविष्याच्या दृष्टीकोनातून काही चर्चा झाली का ? पुढे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला अजून काही बदल पहायला मिळतील का ? असे प्रश्न अनेकांना पडत आहे.  मात्र यांचे उत्तर भविष्यातच कळतील असा अंदाज बांधला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘सागर’ बंगल्यावर गेले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

Protected Content